रागाच्याभरात माणूस आपल आयुष्य आपल्याच हाताने खराब करत असतो पण त्यावेळी त्याला जर एखादा मार्ग दाखवणारा भेटला ना तर तो नक्कीच आयुष्य खराब होण्यापासून वाचवू शकतो 😢❤
जेव्हा तो व्यक्ती सम्यक ला गोष्ट सांगत असतो. तेव्हा सम्यक झोपी जातो. पण त्या व्यक्तीने आधीच बोललेलं असतं की गोष्ट पूर्ण ऐकायची. आणि ती व्यक्ती सम्यक ला भेटल्यापासून धैर्याबद्दल बोलत होती. पण जेव्हा सम्यक झोपतो, तेव्हा त्याचेच विचार त्याला संयम बद्दल स्वप्न दाखवायला लागले. कारण सम्यक च्या स्वप्नामध्ये त्याच्या चंचल वृत्तीने त्याला त्या व्यक्तीची गोष्ट पूर्ण ऐकू दिली नाही. माणसाचे चंचल विचार त्याला नुकसानकारक ठरू शकतात हे समजतं. पण जेव्हा तो धैर्याबद्दल धडा शिकतो ( स्वप्नामध्ये का होईना ), तो पूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी तयार होतो. पण ती व्यक्ती ती गोष्ट पूर्ण करत नाही. यातून दिग्दर्शकाला फक्त हे सांगायचं होतं की, चंचल वृत्ती माणसाला कशी हानिकारक ठरते, पण वेळीच जर आपण धैयशील राहायला शिकलो तर आपण जीवनाचा खरा अर्थ समजू.