मोकळा,सुटा,उभा चिरलेला कांदा असेल,पाणी न घालता घट्ट मळून घेतला तर कांदा भजी खमंग व कुरकुरीत होतात.बेसन घालायच्या अगोदर अख्खे धणे जरासे कुटून,बारिक चिरलेली कोथिंबीर,बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,कांद्यात टाकल्या तर भजी जास्त चमचमीत होतात.सैलसर भजी खुप तापलेल्या तेलात सोडल्यावर ४/५ मिनिटां नंतर विस्तवाची आच मिडीयम करून भजी लालसर होईपर्यंत तळली तर भजी आत मधून छान तळली जाऊन बेसन कच्चे लागत नाही.
अभिच्या हातची कांदा भजी म्हणजे प्रश्नच नाही मस्त कुरकुरीत असणार.सेजु तू lucky आहेस तुला म्हणशील त्या प्रकारची भजी म्हणशील त्या वेळी अभी हजर करणार ❤️🥰 तुम्ही दोघे एक दुजे के लिये असे अनुरूप आहात.असेच कायम सुखात आनंदात रहा. कृष्णाई हा kitchen चा नविन सेट up केला आहे का? खूप छान आहे