ज्याप्रमाणे विद्यानंद बापट यांना प्रसिद्धी मिळाली त्याचप्रमाणे काबरे सर तसेच इतर अनेक विज्ञानवादी पुरोगामी चळवळीतील लोकांना जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे
समाजाला खरच सुधारण्याबाबत इच्छाआहे काय? नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवाने हे दाखवून दिले आहे. बापट सर यांचे विकृत स्वरूप दाखविण्यात या मंडळींना आनंद वाटला आहे..
जगदीश काबरे साहेब एकदम ग्रेट माणूस आहेत. मी त्यांना अनिस च्या माध्यमातून ओळखतो.
लोकांना "देव" ह्या भ्रामक संकल्प्नेतून बाहेर काढण्यासाठी अत्यंत तळमळीने काम करणारी व्यक्ती आहे. एकदम अभ्यासपूर्ण बोलतात. एकसं सिम्पल राहणीमान बहुजन समाजाचा, मुस्लिम अंधश्रद्धेत अडकलेल्यांचा, दलितांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून "देव नाहीच" अशी अत्यंत सुसंगत, आणि विज्ञानाला धरून मांडणी करणारे सर आहेत हे.
देव ही संकल्पना तड्डन वेडगळपणाची असली तरीही हे उघडपणे जो संतो त्याला हमखास विरोधाचा सामना करावा लागतो. त्याच्याशी संबंध असणारे बरेच त्याला विक्षिप्त किंवा चक्रम असल्याचे मानतात. मला हा अनुभव अनेकदा आलेला आहे.
छान मांडणी छान, संवाद, मनात, अनेक प्रश्न निर्माण होतात, परंतु, तुमच्या , सारखे, विचारवंत, विवेक शिल विचार, मांडतात, तेव्हा, बरं वाटते, निसर्ग हाच परमेश्वर, आणि आई वडील हेच खरे जिवंत देव, हे सहज,समजते,
आदरणीय डॉक्टर रणदिवे आपण डॉक्टर जगदीश काबरे सरांशी जो जो विचार विनिमय केला तो अत्यंत उद्बोधक विवेकवादी आणि माणसांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारा आहे अशा चांगल्या चांगल्या मुलाखती आपण घेत चला आणि महाराष्ट्रभर त्याचा प्रसार आणि प्रचार करा प्राध्यापक लहाने सर
स्वतःला देशभक्त म्हणवणारे सत्ता प्रेमी खोटे लोक देशाचे केवढे मोठे नुकसान करत आहेत याची कल्पना या व्हिडिओतून येते खूप सुंदर व्हिडिओ होता भविष्यात कृपया काबरे सरांनी विज्ञान तर्कशास्त्र अधिकाधिक सोप्या भाषेत सर्वांना समजावून सांगावे
धर्माचा आधार घेऊन सामाजिक, राजकीय वर्चस्व निर्माण केले जाते माणुस धार्मिक होतो कारण त्यांच्यामागे जास्त लोक राहतात आमच्याकडे जेमतेम वाचन करणारे लोक त्यांच्या बोलण्याचे कौशल्य असल्याने कोणी महाराज,पाद्री तयार होतात.आणि सुशिक्षित लोक त्याच ऐकत असतात.